0
4
8
2
9
7
काहूर
मनात उठलेल्या गं वादळाला
शमवेल कोण गं तुझ्याविना
तडफडतोय गं माझा जीव
वाळूवर मासा गं पाण्याविना
काहूर पेटलंय गं मनामध्ये
एकांती भेटशील का वनामध्ये
रान वादळाला गं मिळेल शांती
उजळून निघेल तुझी गं कांती
चातकासारखी पाहतोय वाट
काहूर हृदयी उसळेल का लाट?
पिसारा फुलवून मोर नाचतोय
मधुगंधात चिंब होऊन हासतोय
काहूर मनी जाशील का सोडून?
स्नेहबंध असा अकस्मात तोडून
दे गं आजन्म साथ बनून सावली
बेधुंद आसमंती करू शतपावली
संग्राम कुमठेकर,लातूर
==========
0
4
8
2
9
7



