Breaking
अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रसाहित्यगंध

सत्वपरीक्षा

प्रवीण हरकारे ता. नगर जि.अहमदनगर

0 4 8 2 9 4

सत्वपरीक्षा

सत्वपरीक्षा माझी पाहिली
देवाने अनेकदा आयुष्यात
विश्वास ठेवला तयावर
महाभयंकर प्रसंगात

चार वर्षाचा माझा मुलगा
बागडत होता बाल्कनीत
खेळत होता बहिणीसंगे
काय घडले हे अकस्मात

बाल्कनीतून पडला रस्त्यात
डोके फुटले त्याचे क्षणात
ठोका चुकला मम ह्रदयाचा
भिती दाटली माझ्या मनात

सखे शेजारी धाऊन आले
उचलूनिया माझ्या बाळाला
रुग्णवाहिकेत टाकले
निघालो सर्वजण पुण्याला

मांडीवर होता माझाबाळ
परमेश्वराचा धावा करीत
बोलले मी नवस अनेक
पहाटे गेलो दवाखान्यात

तज्ञ डाॅक्टरांच्या औषधाने
बरं वाटलं माझ्या बाळाला
परमेश्वराच्या कृपेने
लाभला पुनर्जन्म मुलाला

भेटण्या बाळाला आली आजी
सांगे प्रल्हादच्या गोष्टी त्याला
करता चौकशी तब्येतीची
वदला देवाने झेलले मला

प्रवीण हरकारे
ता. नगर जि.अहमदनगर
==============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे