Breaking
आरोग्य व शिक्षणकविताक्रिडा व मनोरंजनखानदेशचारोळीपरीक्षण लेखमहाराष्ट्रसाहित्यगंध

आयुष्याला आनंद देणारा ‘साहित्य प्रवास’

श्रीमती सिमादेवी निंबाजी बेडसे ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव

0 6 2 9 0 4

आयुष्याला आनंद देणारा ‘साहित्य प्रवास’

प्रिय सखींनो आणि माझे सर्व साहित्यप्रभू आदरणीय दादा-ताईंनो..!

दिनांक २३ सप्टेंबर रोजी माझ्या ‘समाधान’ या चित्र चारोळीला सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी ‘आसू आणि हसू’ या चारोळीला सर्वोत्कृष्ट सन्मानपत्र, तसेच ३ ऑक्टोबर रोजी ‘जनमत’ या चारोळीला सर्वोत्कृष्ट सन्मान मिळाला. या तिन्ही सन्मानांनी मन आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून आले आहे. कामाचा व्याप आणि इतर कारणांमुळे या आनंदाबद्दलचे मनोगत वेळेत व्यक्त करता आले नाही. पण मनातला आनंद मात्र प्रत्येक क्षणी सोबत होता.

‘समाधान’ हा शब्दच किती सुंदर! आयुष्यात कितीही धावपळ असली, कितीही अपेक्षा असल्या, तरी मनाला जेव्हा ‘आहे त्यात आनंद आहे’ असे वाटते, तेव्हा खरे समाधान लाभते. बाहेरच्या जगात कितीही यश मिळाले तरी मनःशांती आणि समाधान नसेल, तर त्या यशाची किंमत कमीच वाटते. माझ्या ‘समाधान’ या चित्रचारोळीला मिळालेला हा सन्मान माझ्यासाठीही मनस्वी समाधान देणारा क्षण ठरला.

त्यानंतरची ‘आसू आणि हसू’… जीवन म्हणजे सुख-दुःख, हसू-आसू यांची सुंदर गुंफणच आहे. कधी डोळ्यांत आसवे येतात, तर कधी ओठांवर हसू फुलते. पण या दोन्ही भावनांमधूनच जीवन अधिक समृद्ध होत जाते. दुःख आपल्याला शिकवते आणि आनंद जगायला शिकवतो. म्हणूनच ‘आसू आणि हसू’ या दोन्हींचे आपल्या आयुष्यात तितकेच महत्त्व आहे. या चारोळीला मिळालेला सन्मान माझ्या मनातील भावनांना मिळालेली सुंदर दाद वाटते.

आणि ‘जनमत’… समाजाच्या वाटचालीत जनमताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामान्य माणसाच्या मनात उमटणारे विचार, भावना आणि अपेक्षा यांचे प्रतिबिंब म्हणजे जनमत. लोकशाहीमध्ये जनमत हे केवळ मत नसून, समाजाच्या परिवर्तनाची ताकद असते. योग्य विचारांना मिळणारी जनतेची साथ समाजाला सकारात्मक दिशेने घेऊन जाते. ‘जनमत’ या चारोळीला मिळालेला सर्वोत्कृष्ट सन्मान माझ्यासाठी केवळ पुरस्कार नसून माझ्या विचारांना मिळालेली सुंदर पोचपावती आहे. या तिन्ही सन्मानांबद्दल मराठीचे शिलेदार समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर आणि आदरणीय सर्व परीक्षकवृंदांचे मनःपूर्वक आभार. आपल्या पारखी नजरेने माझ्या लिखाणाची घेतलेली दखल ही माझ्यासाठी खरोखरच मोठी प्रेरणा आहे.

मराठी भाषा सक्षमीकरणाचा ध्यास घेतलेला हा समूह विविध प्रकारच्या स्पर्धा आणि उपक्रम राबवत आहे. आपण सर्वजण या सुंदर कार्याचे शिलेदार आहोत. त्यातीलच एक अतिशय सुंदर उपक्रम म्हणजे ‘साप्ताहिक साहित्यगंध’. ‘साहित्यगंध’मध्ये कोणत्याही विषयावर मनातील भाव व्यक्त करण्याची संधी मिळते आणि आपल्या लिखाणाला सन्मानाने स्थान मिळते. आदरणीय राहुल सर आणि सखी सविता आपणास वेळोवेळी अवगत करत असतात की, आपले साहित्य पाठवा.

सुरुवातीला आदरणीय दादांनी मला संदेश करून साहित्यगंधसाठी साहित्य पाठवण्यास सांगितले. मला त्याचा फारसा अनुभव नव्हता. एक विषय दिला असेल तर त्यावर लिहिणे सोपे जाते; पण कोणताही विषय न देता मनातील विषय शोधून त्यावर लिहिणे थोडे कठीणच वाटत होते. मला लिखाणाची आवड पूर्वीपासूनच आहे. नोकरीला लागण्यापूर्वी आणि लग्नाआधीही मी लिखाण केलेले आहे. त्यामुळे दादांनी साहित्य पाठवा असे सांगितल्यावर मी विचारले, “माझे जुने लिखाण आहे, ते पाठवले तर चालेल का?” त्यावर आदरणीय दादांनी अतिशय सुंदर उत्तर दिले—
“लिखाण जुने किंवा नवे असे नसते.”

या एका वाक्याने मनात कुठेतरी असलेली अनामिक भीती दूर झाली. आत्मविश्वास वाढला आणि आज मी माझे लिखाण नियमितपणे ‘साहित्यगंध’ या साप्ताहिकाला देते. साहित्यगंध, चारोळी, कविता, चित्रचारोळी, त्रिवेणी, हायकू, बालकाव्य अशा विविध साहित्यप्रकारांतून आपण वेगवेगळ्या विषयांशी समरस होतो; लिहितो, वाचतो, प्रतिक्रिया देतो, मनोगत व्यक्त करतो आणि त्यातून सतत शिकत राहतो. हा साहित्यिक प्रवास माझ्यासाठी आनंददायी आणि समृद्ध करणारा आहे.

माझ्या साहित्याला वेळोवेळी भरभरून दाद देणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या आणि माझ्या लेखणीला बळ देणाऱ्या सर्व दादा-ताईंचे मनःपूर्वक आभार. आपल्या प्रेमळ प्रतिक्रिया आणि कौतुकाचे शब्द हीच माझ्यासाठी पुढे लिहिण्याची खरी प्रेरणा आहे. माझ्या लेखणीला मिळालेल्या या सन्मानाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. ही साहित्याची वाट अशीच सुगंधित राहो, मराठीची सेवा आपल्या सर्वांच्या हातून अशीच घडत राहो आणि आपल्या लेखणीतून मराठीचा गंध दरवळत राहो, हीच मनःपूर्वक इच्छा. आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार! धन्यवाद…!!!

श्रीमती सिमादेवी निंबाजी बेडसे
ग्रामपंचायत अधिकारी, चाळीसगाव
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 0 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे