Breaking
अहमदनगरआरोग्य व शिक्षणकविताकोकणक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशनाशिकपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रमराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

चोखंदळ खवैय्यांसाठी ‘जुगाड’ तंत्रातून खास व्यवसाय’; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

0 4 8 2 9 3

‘चोखंदळ खवैय्यांसाठी ‘जुगाड’ तंत्रातून खास व्यवसाय’; विष्णू संकपाळ

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेचे परीक्षण

ऋतु कोणताही असो, जगाला जागे करणारी अलवार सकाळ असो की, जगरहाटीला विश्रांतीचे वेध लावत ढळणारी सायंकाळ असो, आठवडी बाजाराचे लहानसहान गाव असो की गजबजलेले शहर असो, गल्ली चौक असो अथवा असो हमरस्ता, जिथे जिथे जाई फिरस्ता तिथे तिथे अगदीच मोजक्या जागेत पोटाची भूक आणि जिभेची चव भागवणारी, खवैय्यांच्या खवैयेगिरीला साद घालणारी आणि सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी अशी मस्त रेलचेल असणारी तरीही सस्ता भाव लावणारी ही फेरीवाली मंडळी म्हणजे आपापल्या गुणवैशिष्ट्यासह शहरात आणि चोखंदळ ग्राहकांच्या मनात खास जागा निर्माण करून आहेत. कारण त्यांनी ‘जुगाड’ तंत्रांच्या सहाय्याने निर्माण केलेली आपली व्यवसायातील कल्पकताही नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे फलित आहे.

अर्थात हौसमौज म्हणून जिभेचे चोचले पुरवणारे जसे हौसे, गवसे असतात, तसेच या गिर्‍हाईकांत उपासमारीने त्रस्त असणारे अनेक कंगाल ग्राहकही असतात. ज्यांना जेवण दुरापास्त असते त्यांना या वडापावच्या हातगाड्यांचाच आधार असतो. याचीच दुसरी बाजू अशी की ज्यांच्या हातात कला आहे मात्र खिशात मोठे हाॅटेल उघडण्याइतका पैसा नाही असे काही लोक चरितार्थासाठी मोटरसायकल, हातगाडी, रिक्षा, अथवा लाकडी खोका उभारून ठराविक वेळी हा जोडधंदा करत असतात. अनेक समस्यांना पाठीशी घालत सुहास्य वदनाने ग्राहकसेवेचा धर्म निभावत असतात.

चवीचा घास
चार पैशाची आस
अखंड ध्यास

‘मराठीचे शिलेदार’ समूहात काल ‘शुक्रवारीय हायकू काव्य’ स्पर्धेकरीता आदरणीय राहुल दादांनी, एका स्कूटरवर थाटलेल्या टपरीवजा चहानाष्ट्याच्या दुकानाचे चित्र दिले होते. आणि दररोजचा नियमित अनुभव घेणार्‍या शिलेदारांनी सुद्धा या विषयावर रचनांची बरसात केली. जणू काही अनेक खमंग, चटकदार, खुसखुशीत गरमागरम पदार्थासह याच व्यवसायाची उदरभरणाची दुसरी बाजू सुद्धा अगदी समर्थपणे मांडली. सर्वांच्या लिखाणाला भरभरून शुभेच्छा. आज मला परिक्षणाची संधी दिल्याबद्दल आदरणीय राहुल दादा आणि समूह व्यवस्थापनाचे आभार.

विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर
©परीक्षक, सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे