अहमदनगरई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध
आनंद तो सुगंधापरी
डाॅ. नझीर शेख राहाता जिल्हा अहिल्यानगर
0
4
8
2
9
0
आनंद तो सुगंधापरी
परोपकाराने पसरते
आत्मिक समाधान उरी
दरवळे दाही दिशांना
आनंद तो सुगंधापरी
कुणाचे पुसावे अश्रू
कुणा सहानुभूती द्यावी
या सत्कर्मांनी येईल
सुखद अनुभूती अंतरी
भेटे कुणी भुकेला
अन्न द्यावे तयासी
तृषार्ताला पाणी द्यावे
तृप्ती लाभे तयास खरी
स्वार्थासाठी जगणे
नाही हे खरे जगणे
यावे इतरांच्या कामी
पुण्याई लाभेल परोपरी
ठेवावा हाच आदर्श
पाडावा हाच पायंडा
मगच जीवनात येईल
अतीव रंगत न्यारी
डाॅ. नझीर शेख राहाता
जिल्हा अहिल्यानगर
0
4
8
2
9
0



