0
4
8
2
9
0
रानसभा
एकदा प्राण्यांनी ठरवले
घेऊ आपण रानसभा
पक्षांनाही होती
सभेत यायची मुभा.
हरिण होता चपळ
लावला पहिला नंबर
धावत पळत आला
पाठीमागून सांबर .
हत्ती आला डुलत डुलत
केला सोंडेने सलाम
जिराफाने मान उंचावून
केला सर्वांना राम राम.
पोपट बोले विठू विठू
सभापती कोण
डरकाळी फोडत वाघ म्हणाला
मीच आणखी कोण.
कोकीळेच्या गाण्यावर
थुई थुई नाचे मोर
कलकल करत भोरड्यांनी
मधेच केला शोर.
विमल धर्माधिकारी
वाई, सातारा
0
4
8
2
9
0



