0
4
8
2
9
0
संस्कार खाणीतील
जसे पेरावे तसे उगवेल
दिसतील कर्म त्यात
नाहीतर मुलगा उगारतो
बापावर बघा कसा हात
निसर्गनियम एका पटीत
दुप्पटीत परत मिळणार
केलेले चांगले कर्म फेड
नाहीतरी इथेच सोडून जाणार
कसले गर्व कसला माज
आलोत रिकाम्या हातानी
राहतील सर्व इथल्या इथेच
जाणार रिकाम्या हातानी
गर्वाचे घर कधीतरी
पडेलच तुझे खाली
हे माझे माझे करू नको
रडशील कोसशील नशिबाला
म्हणूनच कर्म असावेत चांगले
राहशील सर्वाच्या स्मरणी
हळहळतील सर्व गेल्यावर
राहतील तुझ्या गोड आठवणी
कुसुमलता दिलीप वाकडे
उमरेड रोड, नागपूर
0
4
8
2
9
0



