Breaking
कवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

पावसाची आठवण; प्रकाश गोधने

नांदेड

0 4 8 2 8 6

पावसाची आठवण

आभाळ भरून आले
की तुझी आठवण येते
थेंब थेंब आठवणीचे
आठवणीचा पूर होते

पावसाच्या पहिल्या सरीत
चिंब चिंब भिजायचीस
नजरेला नजर भिडवून
किती गोड लाजायचीस

खुललेलं यौवन तुझं
इंद्रधन भासायच
प्रेमपिसारा फुलवून
मनमयूर नाचायच

पाऊस येऊन गेला की
आंगनात तळ साचायच
चिंब होऊन डोळ्यापुढे
तुझं येणं जाणं असायचं

मिलनाची ओढ सखे
डोळ्यात तुझ्या दिसायची
तुझ्यात विरघळून जाण्याला
माझी सहमती असायची

पहिल्यासारखा आभाळ
आता भरून येत नाही
आलाच कधी पाऊस
तर मी पावसात जात नाह

प्रकाश पुंडलिक गोधने
कंधार जि. नांदेड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे