
0
6
2
9
0
4
मनसंवाद
शब्द होतात मुके
चालते मनात द्वंद
प्रश्न आणि उत्तरे
प्रक्रियेचा सुरू छंद
आप्त, स्वकीय, मित्र
नसे कुणी सोबतीला
मनसंवाद होतो सुरू
गती मिळते विचाराला
मनाने मनाशी उत्तम
साधण्यासाठी संवाद
विचारांचे प्रकटीकरण
व्हायला हवे निर्विवाद
मनसंवाद एकटेपणात
करी विचारांचा कल्लोळ
आदानप्रदान प्रक्रियेने
होई मन हलके निर्मळ
निरोगी मन आरोग्याचे धन
तार जुळवी संवादाचे उत्तम
प्रेमभाव,आदर भावनांनी
मने जुळती चिरंतन सर्वोत्तम
सुलोचना लडवे
जिल्हा अमरावती
0
6
2
9
0
4



