0
4
8
3
0
0
गोडी मातृभाषेची
मराठी भाषा आमुची
आण, बाण, शान
मातृभाषेची गोडी रुजवू
विद्यार्थ्यांच्या मनामनात
मराठी भाषा नटते
सोळा सिंगरांनी
काना, मात्रा, वेलांटी
तिच्या अलंकारांनी
मराठी भाषेची हेटाळणी
नको स्वतःच्याच घरात
बाळगू तिचाअभिमान
पोहचवू तळागाळात
साहित्य अन् इतिहास
मराठीचा महान
संत महिमा ऐकून
उंचावते आमची मान
गोडी मातृभाषेची
वृद्धिंगत करूया मनामनात
मनी ठेवू सन्मान सदा
राहू तिच्या ऋणात
अस्मिता हत्तीअंबिरे
ता.जि.परभणी
0
4
8
3
0
0



