
0
4
8
2
9
3
संभ्रम
काही कळेना मला
तुझे हे बहाणे
हृदय मोकळे करणे कधी
कधी असे मौन रहाणे?
भिती वाटते मला
तुझ्या अशा वागण्याची
निद्रेत असते कधी
कधी रात्र जागण्याची?
सांगु कितीदा तुला मी
घेशिल गांभीर्याने कधी मला
चंद्र ही लाजतो तुला
दाखविशी किती तु चंद्रकला
झाल्या गेल्या आपसात
किती गुजगोष्टी
तरीही का हटेना
तुझ्या वरील दृष्टी
पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड,नागपूर
========
0
4
8
2
9
3



