0
4
8
2
9
0
शेतकऱ्याची राखण
माझ्या शेतात पिके बहरली,
ज्वारी जोरात छान डोलली।
पाखरुं पासून राखण करी,
माऱ्यावरती बसून शिरी।
हाकलतो त्यांना दोरी खेचून,
टापर वाजवी जोरात गाऊन।
गोफन फिरवी गोटा धरुनी,
पाखरुंना धडका देत सुटणी।
थवा राघाचा मधेचि येतो,
आवाज करी उड्या मारीतो।
शांत चिमण्या त्रासून जातात,
दाणे खाण्या अडचणी येतात।
सकाळ-सांजे जीव लावुनी,
शेतमळ्याची राखण करुनी।
तेव्हाचि भाकर मिळते पोटी,
शेतकरी जीवन हेचि खोटी।
डॉ. बालाजी राजूरकर
हिंगणघाट जि. वर्धा
0
4
8
2
9
0



