Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणमहाराष्ट्र

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये कांदळवन जनजागृती कार्यक्रम संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये कांदळवन जनजागृती कार्यक्रम संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: मंगळवार दि. १५ जुलै २०२५ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये स्वर्गीय प्रभाकर सदाशिव राणे सभागृहात इ. ८ वी ते इ. १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र वनविभाग, वनपरिक्षेत्र अधिकारी अलिबाग ( कांदळवन ) व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्यामार्फत कांदळवन आणि किनारी जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धन जनजागृतीसाठी कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला प्रकल्प समन्वयक – मत्स्य प्रिती सावंत मॕडम आणि प्रकल्प समन्वयक – वानिकी दिव्या घाग मॕडम यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना कांदळवनाच्या प्रजाती, तिथे रहाणारे पशू आणि पक्षी, कांदळवनांना असणारे धोके, कांदळवनाचे महत्व, कांदळवन जैवविविधतेची व सागरी जिवांची माहीती तसेच महाराष्ट्र शासनाच्या वनविभाग – कांदळवन कक्ष आणि कांदळवन प्रतिष्ठान मार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना यांविषयी माहिती दिली व मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी सचिन भंडारे सर, सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील मॕडम, दिव्या भगत मॕडम, आशिष राणे सर, सुनिल मोरे सर, प्रियंका राणे मॅडम हे सर्वजण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे