0
4
8
2
9
3
विषमता
देवा तुझी विषमता
अजून मज कळेना
सागरास किती जल
तृषार्तास थेंब मिळेना…!!१!!
कोणासाठी तूप रोटी
पंचपकवान्न खायला
कोणी केरकचऱ्यात
जातो अन्न शोधायला…!!२!!
देवा तुझ्या वशिल्याचे
सुवर्ण हिऱ्यात मढलेले
बिगर वशिल्याचे मात्र
भाकरीसाठी लढलेले…!!३!!
कोणाला देतोस देवा
तू आनंद आभाळभर
काहींना संघर्ष दुःख
का देतोस आयुष्यभर…!!४!!
सर्वात मोठी विषमता
खोट्याला देतोस न्याय
सत्याचीच सत्वपरीक्षा
घेऊन करतोस अन्याय…!!५!!
राजश्री मिसाळ ढाकणे
जिल्हा बीड
==========
0
4
8
2
9
3



