सेवापूर्तीचा दिन
आला सेवापूर्तीचा दिन
जड झाले मन,
आठवणीच्या,काहु राने
आले भरुन नयन.
प्रिय,चिमुकल्यानो
का लावला?इतुका लळा,
तूमच्या,किलबिला टाने फुलला
माझ्या जीवनाचा विरान मळा,
मन झाले सैरभैर
तुम्हा सोडताना,
पायअडखळे, शाळे च्या दारात
सेवानिवृत,होताना
वासुदेव कुटुंबकम, प्रमाणे
लाभले,आहेत सहकारी,
जिव ओवाळून टाकावा असे
कार्यकर्तृत्व त्यांचेच भारी.
बोलायलाही आज
शब्द साथ देत नाहीत,
भावना कातूर होऊन
आवाज निघत नाही.
हें बंध, माणुसकीचे
असेच अतूट राहू द्या,
वेळप्रसंगी गडबडले तर
शिरी, तुमचा हाथ असू द्या.
होते आपले, काही ऋणानुबंध
तें,या जन्मी होते फेडायचे,
कणभर सेवेतून आता
मला उतराई व्हायाचे.
मन तुमचे,अथांग सागर
गावाकऱऱ्यांनो ज्ञात मला,
हृदय कोंदणात जपेल
स्नेहमाया ममतेचा जिव्हाळा.
बिंदू स्वरूप कार्य माझे
तुम्ही गोड मानिले,
म्हूणन नतमस्तक होऊन
सर्वांचें आभार मानिले.
चुकले मुकले काही तर
मोठया मनाने माफ करावे,
पाहुणी मी घडीभरची
आता निरोप द्यावे.
मायादेवी गायकवाड ठोकळ
ता.मानवत, जि.परभणी
===========



