0
4
8
2
8
6
फुरसत
आभासी या साऱ्या जगात
गुंता नकली नात्यांचा
कोण आपले कसे कळावे?
बाजारची हा मुखवट्यांचा
भासमान या दुनियेमध्ये
लाईक्स कमेंट्स अवतीभवती
ज्याला त्याला विसर पडतो
आपली माती,नाती कोणती?
आभासाशी जडले नाते
कुणासाठी आपले अडले?
दोन प्रेमळ शब्दांसाठी़
वृध्द जीव हे आसुसले
विस्तारू दे तरु कीर्तीचा
आम्हा ही अभिमान तयाचा
फुरसत काढून वळून पहा
हालहवाल पुसा मुळांचा
नाती आपली दृढ करण्या
संवादांचे पूल बांधूया
भेटीगाठी करता करता
विश्वबंधुत्व आपण जपूया
वृंदा (चित्रा) करमरकर
ता. जि.सांगली
========
0
4
8
2
8
6



