Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरनागपूरमहाराष्ट्रविदर्भ

नितीन गडकरींच्या हस्ते ‘श्री गजानन विजय ध्वनी ग्रंथ’ पोस्टरचे प्रकाशन

देशांत प्रथम ध्वनी-चित्र ग्रंथ भक्तांसाठी तयार!

0 4 8 2 9 7

नितीन गडकरींच्या हस्ते ‘श्री गजानन विजय ध्वनी ग्रंथ’ पोस्टरचे प्रकाशन

देशांत प्रथम ध्वनी-चित्र ग्रंथ भक्तांसाठी तयार!

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर : श्री गजानन महाराजांच्या प्रचितीवर आधारित ‘श्री गजानन विजय ध्वनी ग्रंथ’ हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील अनोखे साधन लवकरच भक्तांना समर्पित होणार आहे. या ग्रंथाच्या पोस्टरचे आज गडकरी यांच्या हस्ते नागपूर येथे स्नेहपूर्ण प्रकाशन झाले. हा ग्रंथ केवळ वाचनीयच नव्हे, तर ध्वनी-सक्षम असल्याने ऐकता येणारा देशातील पहिला ग्रंथ म्हणून चर्चेत आहे.

ग्रंथनिर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या प्रा. गिरीश देशमुख, डॉ. अश्विनी देशमुख, उमेश महाजन, उदय महाजन, अमर इंदूरकर, डॉ. माधुरी इंदूरकर, संगीतकार विरेंद्र लाटणकर, निर्मिती सहाय्यक अजय बिवडे व ध्वनी संयोजक महेश तिवारी यांची याप्रसंगी उपस्थिती होती. इन्स्टाग्रोथ मर्चँडाइज एलएलपीने निर्मिती केली असून, श्याम पेठकर व भाग्यश्री पेठकर यांच्या मार्गदर्शनात ‘वर्ड्स अँड व्ह्यूज’ संस्थेने करिता लेखन पूर्ण केले. भजन लेखन महेंद्र पेंढारकर, चित्रे उमेश चारोळे व संजय मेश्राम, संगीत नियोजन पवन तिवारी, मांडणी व सजावट राजेंद्र क्षीरसागर व प्रशांत वानखेडे यांचे सहकार्य लाभले.

ग्रंथाची अनोखी वैशिष्ट्ये: ५०० पानांचा भव्य ग्रंथ आकर्षक बॉक्समध्ये पॅक. महाराजांच्या लीलांवरील २५० हून अधिक रंगीत चित्रे. सोबत विशेष सेंसर –टेकला की संपूर्ण ग्रंथ ऐकता येईल. २१ अध्यायांना संगीतमय चाली, सेंसरने प्रत्येक अध्याय श्रवणीय श्लोक, निरूपण, लीला- व्यक्ती- स्थळांची माहिती मराठी, हिंदी व इंग्रजीत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी बोधवाक्ये –तीनही भाषांत ऐकता येतील.चित्रावर सेंसर टेकला की भजन सुरीली चालीत वाजेल. हा प्रेक्षणीय, वाचनीय व श्रवणीय ग्रंथ भक्तांसाठी वरदानासारखा आहे. गडकरी यांनी प्रकाशना वेळी भक्तीमार्गातील अशा संकल्पनांचे महत्त्व अधोरेखित केले. लवकरच बाजारात उपलब्ध होणाऱ्या या ग्रंथाने गजाननभक्तीला नवे आयाम मिळणार आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे