Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीनागपूरविदर्भसाहित्यगंध

काळरात्र

अर्चना सरोदे सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव

0 4 8 2 9 0

काळरात्र

असे कसे हे विपरीत घडले
विधात्याला का नसेल कळले,
आयुष्याचे सारे गणित चुकले
हसता हसता काळीज रडले…!!१!!

नियतीने क्रूर डाव खेळला
कसा कुणी मग यातून सुटला,
घडीभराचा तो खेळ संपला
मागे भकास एकांत हा उरला…!!२!!

तुझ्या सवे ते रुसणे फुगणे
उगा भांडूनी क्षणात हसणे,
कसे स्वीकारावे या मनाने
तुझे असे आकस्मिक जाणे…!!३!!

तुजवीण जगणे व्यर्थच वाटे
तुझ्या आठवणीने उर ही दाटे,
दिवस सुने नि रात्री भयाण इथे
सांग सख्या तुला शोधू मी कुठे…!!४!!

तुझ्या येण्याची आस संपली
अशी कशी रे तू साथ सोडली,
ती काळरात्र का जीवनी आली
सौभाग्य माझे सवे घेऊन गेली…!!५!!

अर्चना सरोदे
सिलवास,दादरा नगर हवेली आणि दमण व दिव
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे