0
4
8
3
0
1
बेधडक
हाती वाहान
बोलणे उर्मट
आम्हीं महान
वाटे वाईट ॥१॥
तरूणाईची गंमत
आला बेधडक
गेला उडवत
दिली धडक ॥२॥
मागेना वळुन पाहणे
बेदरकार नूर
फटफटीवर जाणे
झाले शूरवीर ॥३॥
कपडे भडक
मस्तीचा धूर
जुगारे नियम कडक
सिगरेटचा पूर ॥४॥
धुंदीचे काहुर
वाहनाशी कुस्ती
मनी नसे हुरहुर
पैशाची मस्ती ॥५॥
मोडून शिस्त
मग्रुरीची शिकस्त
राहती बेशिस्त
तब्बेतीत मस्त ॥६॥
वाहन वाहक
देशाचे पाईक
दारूचे चाहक
कुकृत्याचे सेवक ॥७॥
नीला पाटणकर,शिकागो
=================
0
4
8
3
0
1



