Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

आम्ही असेच

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

0 4 8 2 9 7

आम्ही असेच

आमच्या सारखे आम्हीच आहोत
नको कोणाची तुलना
आम्ही असेच की आम्ही तसेच
कोणाला काही समजेना

वेळप्रसंगी कठोर वज्राहून
झुकतो न कधी,न कधी हतबल
जळतो जशी वितळून मेणबत्ती
आहोत संवेदनशील प्रांजळ प्रेमळ

देता देतो किती न समजे
तन मन धन उधळून टाकतो
समजावून सांगू हजार वेळा
न समजता तोंड ही न पाहतो

मायेचा कधी व्यवहार न केला
प्रामाणिकपणा ह्रदयी ठसला
कोणी देते धोका हास्यात
कपट नीतीचा भाव न उमगला

समजले तरी माफी मनातच
समजावून सांगू पुन्हा पुन्हा
तरी नव्याने गैरफायदा अन्
करतो कोणी तोच गुन्हा

फिरवून तोंड आयुष्य भराचे
पुन्हा न पाहणे होते तिकडे
ओळख ही विसरून जाऊ
होवो काय व्हायचे वाकडे

आम्ही असेच बदलू न कधी
काल आज अन् येवो उद्या कसाही
जमले तर बघा नाही तर सोडून द्या
समजो कोणी वा विसरो समाजही

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे