0
4
8
2
9
0
ताबूत
ऊन वारा पावसातही
तैनात सैनिक सीमेवर,
देशसेवेचे व्रत घेऊनी
नजर ठेवतोय शत्रूवर….
सुरक्षित असतो सारेच
गाढ निद्रेमध्ये झोपलेले,
खडा पहारा चालू असे
डोळयात तेल घातलेले….
भीती न तया संकटाची
पर्वा न करती जिवाची,
शत्रुसवे लढता लढतां
बाजी लावती प्राणाची….
विरमरण पत्करतील ते
परी माघार नाही घेणार,
देशहिताच्या रक्षणास्तव
प्राणाची आहुती देणार….
तिरंग्यात लपेटून शव ते
ताबूत येता सैनिका घरी,
टाहो फोडूनी आक्रोशती
अबालवृद्ध घरची सारी….
अमर रहे जयघोष करत
श्रद्धांजली अर्पण करुन,
सलामी देती जनता तया
आदरांजली वाहे स्मरून….
बी एस गायकवाड
पालम, परभणी
=======
0
4
8
2
9
0



