डाॅ.मधुसूदन घाणेकर आंतरराष्ट्रीय एकपात्री कलाकार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

डाॅ.मधुसूदन घाणेकर आंतरराष्ट्रीय एकपात्री कलाकार जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
पुणे: (दि 23 जुलै): आंतरराष्ट्रीय कीर्तीचे एकपात्री कलाकार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांना नुकताच एशियन कल्चरल अकादमी संस्थेतर्फे ज्येष्ठ साहित्य, संगीत आणि कला अभ्यासक मधुरा यांच्या शुभहस्ते नुकताच आंतरराष्ट्रीय एकपात्री कलाकार जीवनगौरव पुरस्कार ऑनलाईन प्राप्त झाला.
1963 पासून डाॅ.मधुसूदन घाणेकर एकपात्री कार्यक्रम करीत आहेत. भारतासह नेपाळ, न्यूझीलंड, श्रीलंका,भूतान मलेशिया,सिंगापूर, मस्कद, थायलंड, चीन, रशिया, दुबई, हाॅगकाॅग, व्हिएतनाम, कंबोडिया, माॅरिशस, इंडोनेशिया आदि 20 देशात ‘सबकुछ मधुसूदन’ ह्या विश्वविक्रमी एकपात्री कार्यक्रमाचे हजारो कार्यक्रम केले आहेत.
12 नोव्हेंबर 2017 रोजी 6 देशांच्या वर्ल्ड रेकॉर्डस युनियन तर्फे जागतिक पातळीवर टाॅप 100 मधील विश्वविक्रमवीर म्हणून दिल्ली येथे जाहीर सत्कार करण्यात आला होता. डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी देशविदेशात चालता बोलता हिंडता फिरता ‘सबकुछ मधुसूदन ‘ चे कार्यक्रमही केले आहेत. डाॅ.मधुसूदन पाणेकर यांनी शीळवादन,सहीवरुन सही सही स्वभाव सांगणे, रफी-किशोरकुमार यांची सलग गाणी सादर करणे , गाणारे भाग्यांक, गाणा-या सह्या, मधुरंग, असे मित्र तसे मित्र, अशा बायका तशा बायका, बघु तुझा हात, बे दुणे चकली आदि सादर केलेल्या एकपात्री कार्यक्रमाचे सर्वाधिक प्रयोगांचे विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहेत.
सलग सर्वाधिक 90 गायक गायिकांचे प्रत्येकी एकेक गाणे सादर करणे , सलग सर्वाधिक हमिंग-याॅडलिंग आणि आलाप सादरीकरण असेही आगळे वेगळे विश्वविक्रम डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले आहेत. वंचित आणि दिव्यांगांसाठी सर्वाधिक विनामूल्य एकपात्री कार्यक्रम डाॅ.घाणेकर यांनी केले आहेत.
एकपात्री कार्यक्रमांचे सर्व विश्वविक्रम त्यांनी बायपास सर्जरीनंतर केले आहेत(2003) डाॅ.घाणेकर यांच्या एकपात्री कार्यक्रम क्षेत्रातील यशस्वी वाटचालीबद्दल , भारतीय जनता पार्टी-ज्येष्ठ नागरिक आघाडीचे शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, मधुकर्णिका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसच्या संचालिका मधुकर्णिका सासवडे , तितिक्षा इंटरनॅशनलच्या संस्थापक-अध्यक्ष प्रिया दामले,वसुधा इंटरनॅशनलच्या संस्थापक – अध्यक्षा वसुधा नाईक,महिला ज्योतिर्विद संस्थेच्या माजी अध्यक्ष ॲड. सुनीता पागे आदिंनी डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.



