Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरमराठवाडासाहित्यगंध

महाराज आपण असता तर..

प्रा. डॉ पदमा जाधव-वाखुरे छत्रपती संभाजीनगर

0 4 8 2 9 0

महाराज आपण असता तर..

महाराज आपण असता तर…
अब्रूचे धिंडवडे अबलांचे
नसते उडाले रस्तोरस्ती
वाहिले असते वारे नैतिकतेचे
जिरवली असती नराधमांची मस्ती ..१

महाराज आपण असता तर
जगाच्या पोशिंद्याची
नसती झाली वाताहत
नसती बेतली त्याच्यावर
मग आत्महत्येची आफत ..२

महाराज आपण असता तर…
नांदले असते राज्य कायद्याचे
रयतेला मिळाला असता वाली
नावालाही नसते उरले मग
राजकारण इथं फायद्याचे ..३

महाराज आपण असता तर…
घडी नसती विस्कटली
मूल्याधिष्ठित समाजाची
हिंमतच नसती कुणी केली
अन्यायाच्या पाठराखणीची ..४

महाराज आपण असता तर…
मिळालं असतं आपसूक हक्काचं
आलं असतं इथं राज्य
कर्तव्यात धन्यता मानणाऱ्यांचं
करण्या रक्षण मानवता धर्माचं ..५

म्हणूनच म्हणते महाराज…
आपण यावं पुन्हा
स्थापण्या स्वराज्य नी सुराज्य
थोपवण्या इथली झुंडशाही
नी थांबवण्या रयतेची परवड
हवाय एक विश्वस्त आधारवड
हवाय एक विश्वस्त आधारवड ..६

प्रा. डॉ पदमा जाधव-वाखुरे
छत्रपती संभाजीनगर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे