Breaking
ई-पेपरकवितागोंदियाचंद्रपूरदेश-विदेशनागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

मागे ना फिरला

गोवर्धन तेलंग

0 4 8 2 9 7

मागे ना फिरला

स्वाभिमानी भीम होता,कधी मागे ना फिरला।
अन्यायाला ठोकरुन , पुढे पुढेच चालला।।

मनुवादी घनघोर, मुर्दे पाडले मुजोर।
हिनदीन दलितांचे,कार्य करावया थोर।।
भारताचा शिल्पकार,भारतात हो जन्मला //1//

जातीपाती धर्मासाठी,देण्या सुरक्षा प्रदान।
नेहरूंनी केला तेव्हा,सदनात अपमान।
सोडूनी ते मंत्रीपद ,बापांचा बाप जाहला //2//

जातीभेदाचे चटके, सोसूनिया जीवनात।
ज्ञान शिक्षणाणे केला,हा उध्दार भारतात।।
संविधान देऊनिया,देश माझा तारीयला//3//

बुध्द कबीर फुलेंना,मानीले दैवत गुरु।
मानवतेच्या शत्रूसंगे,लढा ठेविला सुरु।।
प्रज्ञासूर्य अवनीचा,दिशादशा उजाळला//4//

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे