0
4
8
3
0
0
धबधबा
डोंगर माथ्यावरूनी
धावी शुभ्र, दुधाळू धार
नखरेल नार जणू ती
नाचते पाषाणावर ।।
नृत्यात दंग होऊनी
रसिक गण नाहती
दुथडीची तरू वेली
रम्य मनोहर दृश्य पाहती । ।
उभे ठाकता काठावरती
शीतल तुषार सिंचन होती
काया मन सकलांचे
चिंबचिंब होऊनी जाती…।।
धबधब्याचा खळखळ नाद
खणखणे दूरवर कानी
पशूपक्षांच्याही मनी
मधूर घण घणघणी ।।
वरूण राजाही सदैव
धुंदित तयाच्या राही….
सोंदर्य त्याचे खुलविण्या
वर्षारानी धावत येई…..।।
कंचना मंडपे
ता. जि.नागपूर
========
0
4
8
3
0
0



