
0
6
2
9
1
2
केशरभात
चिंगीच्या अंगणात
उभा पारिजात
फुलांचा सडा
जणू केशरभात
शेजारचा बंड्या
वात्रट भारी
वेचून नेतो
फुले सारी
आत्याचा मग
त्रागा भारी
जाऊन येते
बंड्याच्या घरी
बंड्या असतो
देवघरात
लावत असतो
फुलवात
त्याला पाहून
आत्या शांत
बंड्याशेजारी
बसते निवांत
बंडूच्या पाठीवर
फिरवून हात
खायला देते
केशरभात
भुमेश्वरीताई सातपुते (खोंडे)
ता. उमरेड जि.नागपूर
0
6
2
9
1
2



