
0
5
6
8
0
6
मुलगा मुलगी समान
भारतीयांनो चला गाऊया समानतेचं गान
एक मुखाने गर्जू सारे, मुलगा मुलगी समान…
झाशीची ती राणी बलिदान हे पहिले
सत्य-अहिंसा शस्त्र घेऊनी बापू अमुचे लढले
गगनी फडकले डौलाने स्वातंत्र्याचे निशान…
सुभाषबाबू गर्जत आले ‘चलो दिल्ली’
देशप्रेमाने पुलकित झाली अरुणा आसफअली
क्रांती मैदानात फडके तिरंगा भारताची शान…
वीर जवाहर प्रधानमंत्री, कन्या इंदिरा
पित्यासवे ती फिरून आली मंगल भारत सारा
तेजस्विनी ती पहिली महिला पंतप्रधान…
खिंडीमध्ये अडवी शत्रू असा वीर बाजी
जिजाऊने घडविला अमुचा वीर शिवाजी
असे वीर अन् वीरबाला भारत देश महान…
भुमेश्वरी सातपुते खोंडे
ता. उमरेड, जि.नागपूर
0
5
6
8
0
6


