Breaking
अलिबागकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्र

सिंग अलॉग म्युझिक तर्फे ‘नभ उतरु आलं’

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 3

सिंग अलॉग म्युझिक तर्फे ‘नभ उतरु आलं’

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: 16 जुलै 2025 रोजी अलिबाग शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालय डोंगरे हॉल यांच्या व सिंग अलॉंग म्युझिक,अलिबाग यांच्या संयुक्तिक विद्यमाने डोंगरे हॉल येथे ” नभ उतरू आलं ” हा पावसाळी हिंदी व मराठी गीतांचा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमासाठी सिंग अलॉंग म्युझिक हबच्या गायकांनी जवळपास 21 पावसाळी गीते सादर केली व संगीतप्रेमी रसिकप्रेक्षकांना स्वरधारांनी चिंब भिजवले. अलिबाग मधिल रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम संपेपर्यंत ती उपस्थिती कायम होती. सिंग अलॉंग म्युझिक हबच्या मेंबर्सनी उत्तम गाणी प्रस्तुत केल्याची पावती रसिकांनी देऊन गायकांचा उत्साह द्विगुणित केला.

या कार्यक्रमासाठी मा. शैला ताई पाटील (कार्याध्यक्ष, सार्वजनिक वाचनालय, अलिबाग) श्री.अजित पवार सर ( जिल्हा ग्रंथालय अधिकारी) श्री.संतोष बोन्द्रे सर (कार्यावह, सार्वजनिक वाचनालय ) यांनी विशेष योगदान दिले तर सिंग अलॉंगचे संचालक श्री. संतोष ल्हासे व रुपाली ल्हासे यांनी त्यांच्या कराओके स्टुडिओच्या मेंबर्सनी मेहनत घेऊन प्रस्तुत केलेल्या गाण्याबद्दल मेंबर्सचे विशेष कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे