0
4
8
2
8
4
हुंकार
अजून किती वैष्णवीचा
जाणार आहे हुंडाबळी
सांगा कधी थांबणार हो
लेकीच्या स्वप्नाची होळी…
हुंड्याची गोंडस रूपे पहा
सोने बंगला आणि गाडी
स्वतः कमावण्याची नाही
कशीकाय अक्कल थोडी…
जनकराजे तुम्ही दानशूर
राजा दशरथ होता वदला
कन्या तुमची घेणारा मी
खरोखर याचक आपला…
येता जाता देतात टोमणे
रंगावरून अकलेचे कांदे
गोऱ्याला अहंकार फारच
बुद्धी जणुकाय अंडे गंदे…
हुंड्याला कायद्यानेच बंदी
मागणाऱ्याला शिकवा धडा
हुंडाबळीचा हुंकार नक्की
भरवील आता पापाचा घडा…
राजश्री मिसाळ ढाकणे
जि.बीड
0
4
8
2
8
4



