
0
4
8
2
9
3
सत्तामेव जयते
सत्यमेव जयते,असे उच्चारापुरते,
सत्ता ही सत्याला,पुरूनिया उरते…
सत्तेपुढे सत्याची,ठरे किंमत शून्य,
सत्तेच्या व्यवस्थेत,सत्य हरवले दूर ते..
असत्याचा बोलबाला, सत्याच्या मुखी टाळा,
ज्यांच्या हातात सत्ता,तोचि हाकली गाडा…
धर्म जाती पंथात, पाजून विषाचा प्याला,
साधूचा वेषधारी,लावी विभूती कपाळा..
मनाप्रमाणे वागणे,भोळ्या लोकां नागणे,
कष्टकरी जनतेच्या,हाती काही न लागणे…
कायदे असे मुठीत, तिजोरी जाई लुटीत,
गलेलठ्ठ संपत्ती,तरी शौक नाही भागणे..
सत्ता हिच बोलते, सत्ता हिच चालते,
जनतेची संपत्ती, नको तिथे उधळते…
‘सुधाकरा’सत्तेची,तुती बोलू लागते,
म्हणूनच म्हणा लागे,’सत्तामेव जयते’
सुधाकर भगवानजी भुरके
आर्य नगर नागपूर
0
4
8
2
9
3



