शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*
*☄विषय : नारळी पौर्णिमा☄*
*🍂शनिवार : ०९ / अॉगस्ट/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*नारळी पोर्णिमा*
कोळीवाड्यातला सण हौसेचा
नारळी पौर्णिमा होतोय वर्षाला,
सुटलाय तो तुफानी वादळवारा
वर लाटांचा मारा सुरू झाला…
समुद्र आणि कोळी बांधव याचं
अतूट नातं बघा आहे जुळलेलं,
श्रावण महिना नारळी पौर्णिमा
हर्ष भरून मन आनंदून गेलेलं…
नारळ वाहुनी करी दर्याची पूजा
वाऱ्यापाण्याची भीती न त्याला,
कोलीय हाय मवा दर्याचा राजा
निघतो दर्याची दौलत लुटायला…
घरदार सोडी जाई दर्या भेटीला
माशानं धराय लावताय झोली,
जीवाची पर्वा भीती ना त्याला
खानदानी हाव जातीनं कोली…
संसारासाठी त्यो जीवाशी खेलं
धोक्याचा रस्ता धरलाय त्यानं,
कोळीनृत्य अन् कोळीगीताचा
लोकगीत दर्जा,मिळतो सन्मानं…
*बी एस गायकवाड*
*पालम परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
श्रावणातील पौर्णिमेला
असते महत्त्व फार,
कोळी करिती आरंभ
मासेमारी समुद्रावर.
कोळी घेतात आशीर्वाद,
नारळ अर्पून समुद्राला
पूजाअर्चा करुनी त्याची
आरंभ करिती नववर्षाला.
पावसाळा संपताच पिके
जोमात येती शेतात,
बहीण-भावा राखी बांधून
वचन रक्षणाचे घेतात.
नारळी पौर्णिमेस गाणी,
नृत्य, सामूहिक भोजन,
वाढविती एकात्मता
समाजात, जपती बंधन.
निसर्गाच्या आशीर्वादाची
पूर्ती करणारा हा सण,
पिक पाहता शेतकरी
आनंदतो, हरखून मन.
*डॉ. बालाजी राजूरकर*
*हिंगणघाट जि. वर्धा*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
मंगल श्रावण मासी
नारळी पौर्णिमा सण
सृजनशील सोहळा
सृष्टीही हर्ष मानसी
कोळी बांधवांचा सण
दरियाला मनोभावे पुजती
सुग्रास नैवेद्य दाखवून
सोन्याचा नारळ अर्पती
सुवासिनी येई माहेरा
उरला ना पारावर मोदाला
हसत,नाचत, हर्षोल्लासात
साजरा करी सणाला
या दिनी येऊ दे जीवनी
सुख समृद्धीच्या तुफान लाटा
सकारात्मकतेची पहाट येऊनी
संपुदे दुःखाच्या खडतर वाटा
*सौ.सुनिता लकीर आंबेकर*
*दादरा आणि नगर हवेली*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा..*
नारळी पौर्णिमा । सण हा राखीचा
मान तो लेकीचा । माहेराला ।।१।।
प्रेम भाव नाते । निस्वार्थी पणाचे
महत्व सणाचे । बहिणीला ।।२।।
कपाळी टिळक । भावा त्रैलोचन
मागे संरक्षण । भावाकडे ।।३।।
हातावर राखी । सोबत श्रीफळ
बसत जवळ । पाटावरी ।।४।।
मागते आयुष्य । राखीच्या धाग्याला
प्रेमळ भावाला । देवाकडे ।।५।।
हक्काने मागते । भावा ओवाळुनी
घाल ओवाळणी । हातावरी ।।६।।
नारळ सोडीला । कोळी बांधवाने
प्रेम भावनेने । सागराला ।।७।।
बंद रेशमाचे । नाते भावनेचे
रेशीम धाग्याचे । असतीया ।।८।।
भाऊराया माझा । दिलदार भारी
देखभाल सारी । करतोया ।।९।।
दिस उत्सवाचा । करुनी वंदन
हे रक्षाबंधन । पौर्णिमेला ।।१०।।
दिन सोनियाचा । हर्ष माधुरीला
ओवाळी भावाला । प्रेमभावे ।।११।।
*सौ. माधुरी पाटील, शेवाळे*
*जिल्हा- नाशिक*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
आभाळ भुईला टेकलं
तुफान वारं हे सुटलं
नारळी पौर्णिमा येता
उधाण दर्याला आलं
सण हा आला वर्षाचा
कोळीराजा हा आनंदला
नाचगाण्यात दंग सारी
सोन्याचा नारळ दर्याला
नभात खुलतो चंद्रमा
रुपेरी चंदेरी ही रेती
मनाला हर्षाची भरती
लाटा या नर्तन करती
मासमारीचा प्रारंभ हा
शिडात वारं हो भरलं
समिंदरासी हाक दिली
सांबाळ माज्या धन्याला
रक्षाबंधन दिन सोन्याचा
भावा बहिणीच्या प्रेमाचा
रेशमी बंधन हे राखीचे
मानबिंदू आपल्या संस्कृतीचा
वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
आली नारळी पौर्णिमा
रक्षाबंधन सोहळा
बहिण भावाच्या प्रेमाचा
हा सण असे वेगळा ॥
नको भाऊराया मज
भरजरी साडी चोळी
नको पाहुणचाराला
तुपाची पुरण पोळी ॥
नको मजला उंच
तुझी महालमाडी
घ्यायला नको आणू
तुझी महागडी गाडी ॥
मायबापाच्या संपत्तीतला
नको मज वाटा
नात्यामध्ये मात्र
नकोरे आपल्यात फाटा ॥
वहिणीसंगे माझ्या
सदा सुखी रहा
भाचरांच्या बालपणात
लहानपण आठवून पहा ॥
ओवाळणीत नको
तुझी किंमती भेट
संवादाचा सेतू
राहो अंतरात थेट ॥
मोकळी सदा असावी
वाट माहेराची
तुझ्या डोळ्यात दिसावी
ओढ बहिणीची ॥
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नारळी पौर्णिमा : -*
आला मास श्रावण
नारळी पौर्णिमा सण
ऋतू मोसम रंगी उत्सवान
भिजवीशी धारा रक्षाबंधन…
ओवाळिते भावा तुजला
औक्षवंत टिळा लाविला
बहिण भावाला राखी बांधे
अतूट धागे प्रेमाचे पौधे !!
जिवलग बैनीची वेडीच माया
ताई आतुरली माहेरी जाया
घुंगराची गाडी आण न्यायला
बसुन जायेनं मी माहेराला !!
माय भरीते ओटी
खण नारळान भेटी
मायेचा लळा दुग्धशर्करा
सुख फुलवीत दिसे किनारा !!
थोरली बहिण आईसमान
भाऊ पाठीराखा करी मान
बंधूपण नाती ऊरात जपते
पवन म्हणे विश्वप्रितं जिंकते !!
*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
कोळी राज्याची
नारळी पौर्णिमा
या मनभावन सणाला
उजळून दिसे प्रतिमा
साऱ्या बाया माणसे
सजून जातात दर्यावरती
नारळ बेल फुल वाहून
दर्याला आशीर्वाद मागती
जीवाच्या खुशाली साठी
करतात दर्याची प्रार्थना
पूजा अर्चना करून
प्रसाद वाटतात सर्वांना
जीव धोक्यात घालून
दर्यात टाकतात नाव
उनवऱ्याचा सोसून मारा
लावतात जीवाचा दाव
दर्यावर करतात मासेमारी
हाच आहे त्यांचा जीवन
मोठ्या हिमतीने मनोभावे
लावून असतात आपलें मन
या नारळी पौर्णिमेला
कोळी गीतांचा राहतो झगमगाट
सुंदर सुंदर पेहराव करून
दिसतो त्याचा वेगळाच थाट
एकमेकांशी वागून प्रेमाने
सर्वांशी राहतात आनंदाने
सारा जीवन दर्याला अर्पण
काम करतात प्रामाणिकपणे
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पोर्णिमा*
ऋतू येता श्रावणी
भिजे पावसात मास
रिमझिम सरींनी चिंब
हिरवळीचा मुक्त वास
अवखळ वाहती निर्झर
होऊन शांत नितळपाणी
पाखरांच्या थव्या संगे
तेही गाती मधूर गाणी
येता सागरा भरती
धावे भेटाया धरेला
जसा बंधू निघे वाटे
पेटे पाऊस इरेला
आली नारळी पोर्णिमा
गाऊ आनंदाची गाणी
बंधूराजाला भेटता
बोले चक्षू मूक वाणी
सण रक्षाबंधनाचा
तया रत्नाचे कोंदण
कच्च्या दोऱ्याने सांधले
जन्मोजन्मीचे बंधन
*सविता धमगाये,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
नारळी पौर्णिमा शुभ मुहूर्त
उगवला दिवस सौख्याचा
रेशीम धाग्यात बांधलेला
बहिण भावाच्या घट्ट नात्याचा
राखी पौर्णिमा सण उत्सवाचा
ओढ बहिणीला माहेरी जाण्याची
भावाला राखी बांधून स्नेहभावे
दिवा उजळून औक्षण करण्याची
एकच तिची मागणी भावला नको
पुरणपोळी नको साडी चोळी फक्त
मला तुझ्याकडून वचन हवे आहे
सदा तत्पर राहा माझ्या रक्षणार्थ
सदा सुखी राहा माझ्या भाऊराया
जन्मोजन्मीच आपलं अतूट नातं
टिळा लावते भाळी तुझ्या ओवाळीते
राखी बांधते कर प्रेमाने पुढे हात
लहानपणी खूप भांडायचो मस्ती
करायचो पटकन कसे मोठे झालो
आपआपले संसार झाले नि दूर गेलो
बघ आज नारळी पौर्णिमेला एकत्र आलो
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पोर्णिमा*
बहिन भावाचे पवित्र नाते
रेशिम धाग्याने तयास बांधिले
नारळी पौर्णिमेस करून साजरे
रक्षाबंधन पर्व नाव दिधले ।।
बालपण त्यांनी सोबत घालविले
कधी चिडविले कधी खोड्या काढीले
संकट येता कधी दुज्यांस
त्यांनीच असते सांभाळले ।।
कृष्ण द्रोपदी शिकवण देई
बहिणीची रक्षा भाऊ करीतो बाई
ज्ञानदेवानी मायेनी वाढविली
तेव्हाच घडली मुक्तईमाई ।।
अभागी मानते मुलगी स्वतःस
जिला नसते भावाची साथ
संकट समयी कोण येईल धाऊन ?
प्रश्न पडतो तिच्या समोर ।।
प्रण करू आपण आमच्या दिनास
सांभाळू नाते बहिन भावाचे
मन-मुटाव नसावा अपल्यात
महत्व तरच रक्षाबंधनास ।।
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



