Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजन

जे. एस. एम. महाविद्यालयात सहज योग ध्यान साधना शिबीर संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 9 0

जे. एस. एम. महाविद्यालयात सहज योग ध्यान साधना शिबीर संपन्न

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: दि. 26/07/2025 जे. एस. एम. महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सहज योग ध्यान केंद्र, महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहज योग ध्यान साधना शिबीराचे’ आयोजन करण्यात आले. यावेळी सहज योग ध्यान केंद्र, महाराष्ट्र या संस्थेचे पदाधिकारी श्री धनेश पराडकर, श्री जितेंद्र पाठारे व श्री बद्रीनाथ जेठा यांनी ध्यान साधना विषयी माहिती दिली.

श्री धनेश पराडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, आपण ध्यान साधनेच्या सहाय्याने राग, द्वेष, तिरस्कार यासारख्या नकारात्मक भावनावर नियंत्रण मिळवू शकतो. त्यानंतर त्यांनी विदयार्थ्यांना ध्यान साधनेचे महत्व विशद केले व ध्यान साधनेची विविध तंत्र प्रयत्यक्षिके करून दाखवली व विद्यार्थ्यांकडून ध्यान साधना करून घेतली. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, उप-प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. अश्विनी आठवले, डॉ. पंकज घरत, प्रा. सचिन भोस्तेकर व एकूण 213 विद्यार्थी उपस्थित होते.
जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा. ॲड. गौतमभाई पाटील यांनी सदर ध्यान साधना शिबिरास शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकात ध्यान साधना शिबीर आयोजित करण्याचा उद्देश स्पष्ट केला व विद्यार्थी दशेत ध्यान साधनेचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी मानसिक एकाग्रता व ताण- तणावापासून दूर राहण्यासाठी रोज किमान दहा मिनिटे ध्यान साधना करावी असे आवाहन प्राचार्या डॉ. सोनाली पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अश्विनी आठवले यांनी केले तर आभार प्रदर्शन उप-प्राचार्य डॉ. प्रविण गायकवाड यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे