0
4
8
2
9
0
आयुष्य
आयुष्यभर सोबत असून
जवळ कधी बसत नाही,
एकाच घरात राहून आम्ही
एकमेकास दिसत नाही ,
हरवला तो आपापसातला
जिव्हाळाचा संवाद,
एकमेकास दोष देऊन
नित्य चाले वाद-विवाद,
धाव धाव धावत आहे
दिशा मात्र कळत नाही,
हृदयाचे पाऊल कधी
हृदयाकडे वळले नाही,
इतकं जगून झालं पण
जगायलाच वेळ नाही,
जपतो आहोत कशासाठी
काहीच कसला मेळ नाही,
एक क्षण येईल असा
घेऊन जाईल हा श्वास,
अर्ध्यावरच थांबलेला
असेल जीवन प्रवास,
अजूनही वेळ आहे
थोडं तरी जगून घ्या,
सुंदर असा जगण्याला
डोळे भरून बघून घ्या,
सुंदर असा जगण्याला
डोळे भरून बघून घ्या…..
सुजीत वाघमारे
ता-जळकोट,जिल्हा-लातूर
0
4
8
2
9
0



