Breaking
ई-पेपरकविताबीडमराठवाडासाहित्यगंध

शेवटचा दिवस

राजश्री मिसाळ ढाकणे ता. जि.बीड

0 4 8 2 8 6

शेवटचा दिवस

दिनदर्शिकेत थांबला आज
जणूकाय एक हळवा श्वास
इंग्रजी वर्षाचा शेवटचा दिवस
अनुभवरूपी पुन्हा भेटण्यास…!!१!!

या वर्षभरातील अनेक दृश्य
सर सर सर धावतच आली
भावना खोल दाबून बिचारी
कर्तव्याने होती बाजी मारली…!!२!!

कळीचे नारद दिसले रक्तात
घेतला कोणी आनंद हिरावून
संयम विवेक शस्त्र वापरूनच
कटकारस्थान दिले भिरकावून…!!३!!

आपल्यातली परकी आणि
परक्यातील आपली खास
हे काही नवीन नाही बरं का
सांगतो आपल्याला इतिहास…!!४!!

शेवटचा दिवस जणू दर्पण
क्षणातच दाखवी वर्ष सारे
नाही सोडत सोबत आपली
करण्यास पूर्ण स्वप्न अधुरे…!!५!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जि.बीड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे