Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये “संविधान गौरव महोत्सव” आणि “मराठी राजभाषा गौरव दिनाचे” आयोजन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

0 4 8 2 8 6

ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये “संविधान गौरव महोत्सव” आणि “मराठी राजभाषा गौरव दिनाचे” आयोजन

तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी

अलिबाग: ॲड. दत्ता पाटील लॅा कॅालेजमध्ये भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त दि.२१ फेब्रुवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान”संविधान गौरव महोत्सवाचे”आयोजन करण्यात आले होते.यानिमित्ताने महाविद्यालयात संविधान विषयावर ग्रंथालयामार्फत प्रश्नमंजूषा आणि पोस्टर मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

तसेच डी.एल.एल.ई.” समितीमार्फत “भारतीय संविधानाची ओळख”या विषयावर निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संविधानाबाबत सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी लॅा कॅालेज ते अलिबाग सार्वजनिक ग्रंथालय या दरम्यान दिं.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ८ वा. जे. एस. एम. महाविद्यालयासोबत “संविधान रॅलीचे” आयोजन लिगल एड समितीमार्फत करण्यात आले.यामध्ये विद्यार्थी,प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला.विद्यार्थ्यांमध्ये संविधानाचे महत्व वृद्धिंगत व्हावा याकरिता महाविद्यालयामध्ये “संविधानाची ७५ वर्षे” या विषयावर सेमिबार समिनीमार्फत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.प्रा.प्रेम आचार्य यांनी संविधानाचे महत्व विशद करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दि.२७ फेब्रुवारी २०२५ रोजी लॅा कॅालेजमध्ये मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथालय समितीमार्फत “विधिशब्द वेध ” आणि “बोला मराठी”या दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विधिशब्द वेध ही स्पर्धा इंग्रजी शब्दांना मराठी पर्यायी शब्द लिहणे अशी होती यामध्ये १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.

या दोन्ही कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यासाठी जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा.ॲड गौतम पाटील, उपाध्यक्ष डॅा.साक्षी पाटील ,लॅा कॅालेजच्या प्रभारी प्राचार्य ॲड.नीलम हजारे यांनी मार्गदर्शन केले.आय.क्यु.ए.सी.
समन्वयक प्रा.डॅा.संदिप घाडगे,ग्रंथालय समिती प्रमुख प्रा.निलम म्हात्रे,डी.एल.एल.ई.समिती प्रमुख प्रा.कौशिक बोडस,लिगल एड समिती प्रमुख प्रा.चिन्मय राणे आणि प्रा.पियुषा पाटील ,ग्रंथालय सहाय्यक कु.श्वेता कावजी, महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे